पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 8 ऑक्टोबरला गडचिरोलीत

54

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (III) गडचिरोली आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे पार पडणार आहे.

या ठिकाणी विविध नामांकित कंपन्या उमेदवारांच्या भरतीसाठी उपस्थित राहणार असून, पात्र उमेदवारांना रोजगार मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक 07132-222368 वर संपर्क साधावा.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, आधारकार्ड तसेच शैक्षणिक पात्रतेची छायाप्रती (झेरॉक्स) सोबत घेऊन स्वखर्चाने ठिकाणी उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी न गमावता उपस्थित राहून रोजगार संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे, यांनी केले आहे.

0000