माजी प्राचार्य मधुकरराव बन्सोड यांचे निधन

153

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली)दि.६ सप्टेंबर २०२५: येथील सिताबर्डी परिसरातील रहिवासी तथा हितकारिणी विद्यालय आरमोरीचे माजी प्राचार्य श्री मधुकरराव मनीराम बन्सोड यांचे अल्पशा आजाराने दिनांक ६ सप्टेंबरच्या पहाटे २.३० वाजता निधन झाले.

माजी प्राचार्य बन्सोड सर हे विनम्रता ,स्पष्टता या गुणांसोबतच विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते.शैक्षणिक,सामाजीक क्षेत्रात विज्ञानवादी दुष्टीकोन बाळगणारे एक व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी हयातभर अध्यापनाचे कार्य केले.सामाजीक परिवर्तनाच्या चळवळीतील विचारधारेवर त्यांची निस्सीम श्रद्धा होती.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,मुली ,जावई व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक ६ सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता गाढवी नदीवरील स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

————————————–

 

💐🙏💐भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आदरणीय आयु.मधुकरराव बन्सोड सरांच्या निधनामुळे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे.आमचे ज्ञान, विज्ञान व सामाजिक क्षेत्रातील खंबीर मार्गदर्शक हरपले आहेत.विद्यार्थीदशेपासूनच माझा ‘सरां’शी आजतागायत संपर्क होता.सर एक विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय, विज्ञानवादी शिक्षक म्हणून सर्वपरिचित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. सरांच्या निधनामुळे बन्सोड कुटुंबियांवर दु:खद आघात झाला आहे.या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर देवो हीच विधायक प्रार्थना 🙏
🙏आदरणीय सरांना ,भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏💐

शोकाकुल
✍️🎙️ विलास गोंदोळे संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज