गणेश उत्सव मंडळाचे सदस्य व नागरिकांनी केले सहकार्य
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी(जिल्हा गडचिरोली),दि.५ सप्टेंबर २०२५:
महाराष्ट्र राज्यात सध्या गणेश उत्सवाची धूम सुरू आहे.दरवर्षी प्रमाणे यंदाही आरमोरी शहरांमध्ये विविध वार्डामध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.गणेश उत्सवानिमित्त मनोरंजनावर अवाढव्य खर्च न करता विविध प्रबोधनात्मक, सामाजिक उपक्रम राबवून एकता गणेश उत्सव मंडळ एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे.
अशातच आरमोरी येथील प्रसिद्ध असलेले सार्वजनिक एकता गणेश उत्सव मंडळ पटेल चौक यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत,सांस्कृतिक कार्यक्रमा सोबतच
आरोग्य तपासणी शिबिर, झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छता अभियान,सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यावरण पूरक सजावट, वार्डातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम असे विविध सामाजिक ,सांस्कृतिक, पर्यावरण संरक्षण व संवर्धन अशा नागरी सुविधांकरीता तसेच सेवा कार्यक्रम या मंडळातर्फे राबवण्यात आले.
अशा बहुविध कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अष्टोप्रहर गणेश मंडळाचे पदाधिकारी अमोल मने, धीरज सपाटे ,संकेत टिचकुले ,रोशन मने ,अमिश मने ,पिंटू हेडाऊ, साहिल मने, कुणाल सारवे ,सौरभ सारवे ,मिथुन शेबे, पवन लाकडे ,आशिष चापले, स्वयंम बोरकर, पंकज मने, लोकेश मने, श्रीराम सारवे,भूषण बोरकर ,गोलू सारवे, शुभम बोरकर ,सचिन हेडाऊ ,सुनील घरफडे ,तनुज मने, पियुष मने, पवन ठवकर ,समीर साळवे, अक्षय हेडाऊ ,गोलू हेमके आदी मंडळातील पदाधिकारी सदस्यांनी सर्वोतोपरी सहकार्य केले आहे.
त्यामुळे आरमोरीकर जनता व गडचिरोली जिल्हावासीयांकडून मंडळावर कौतुकाचा वर्षाव केला केला जात आहे.यंदाप्रमाणेच पुढल्या वर्षीही सामाजिक बांधिलकी जपत भव्य दिव्य कार्यक्रम व उपक्रम राबविण्याचा मानस सार्वजनिक एकता गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.









