गडचिरोली जिल्हा वर्धापनदिन:’प्रज्ञासंस्कार’मध्ये विविध स्पर्धांनी केला साजरा

64

बहुसंख्य विद्यार्थींनी घेतला सहभाग

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेद्वारा संचालीत प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट गडचिरोली येथे गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला शाळेचे समन्वयक डॉ.सुरेश लडके, शाळा मुख्य प्रशासक चेतन गोरे , शाळेच्या मुख्याध्यापिका रिजवाना पठाण उपस्थित होत्या. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .त्यानंतर मुख्य अतिथींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व गडचिरोली जिल्ह्याबद्दल मोलाची माहिती सांगितली.

विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातील संस्कृतीची माहिती व ओळख व्हावी यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.पूर्व प्राथमिक विभागांच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली, यात गडचिरोली जिल्ह्यात असणाऱ्या संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून आकर्षित केले. त्यात तेलगू ,मराठी ,बेंगाली, गोंडी अशा संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले.तसेच इयत्ता सहावी ते दहावी विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या, त्यात महाराष्ट्राच्या ‘विकासात गडचिरोली जिल्ह्याचे योगदान’ या विषयावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे भाषण दिले.

अशाप्रकारे मोठ्या उत्साहात गडचिरोली वर्धापन दिन साजरा झाला. त्यात पूर्व प्राथमिक विभागात गार्वी, चित्रकला स्पर्धेत मेश्राम ,जयश्री शेंडे, प्रावी भुरसे ,दिशा नागोसे, चैत्रा मांढरे या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकाविला ,तर इयत्ता पहिली ते पाचवीच्या गटातून वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी चिन्मयी चिमूरकर ,द्वितीय क्रमांक इयत्ता चौथीचा विद्यार्थी रुद्र मडावी तसेच तृतीय क्रमांक इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी शुभ्रा क्षीरसागर हिने प्राप्त केला. प्रोत्साहन पर बक्षीस इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी आराध्या हर्षे हिने प्राप्त केला.भाषण स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी या गटातून प्रथम क्रमांक
इयत्ता सहावीचा विद्यार्थी नयन पोटे द्वितीय क्रमांक इयत्ता आठवीची विद्यार्थिनी धनश्री भोयर यांनी प्राप्त केला.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका मेघा सुरपाम तर आभार प्रदर्शन वैभवी ओरगंटीवार यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक मुख्याध्यापिका जयश्री टप्पे, उपमुख्याध्यापिका नंदिनी मोहुर्ले, पर्यवेक्षक आशिष ढोले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.