विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि.२७: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या आदेश सूचनेनुसार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 24 में 2025 रोजी, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे 0 ते 18 वयोगट असलेले दुर्धर आधार ग्रस्त बालके आणि दुर्धर आधार ग्रस्त पालक ज्यांना 0 ते 18 वयोगट असलेली अपत्य आहेत. त्या अपत्याकरीता मिशन वात्सल्य अंतर्गत स्पॉन्सरशीप या शासकीय योजनेचा लाभ देण्याकरिता शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिरात 0 ते 18 वयोगटातील एकूण 75 लाभार्थ्यांना मिशन वात्सल्य योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. यामध्ये 9 दुर्धर आजारांनी ग्रस्त बालक, तर उर्वरित 66 लाभार्थी हे दुर्धर आजार ग्रस्त पालकांची मुले होती.
सदर शिबिराला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा मनवर, समितीचे सदस्य काशिनाथ देवगडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महेश भांडेकर (DPO), डॉ. अभिषेक गव्हारे (CSO), आशिष कुकडे (प्रकल्प समन्वयक, विहान काळजी व आधार केंद्र), तसेच क्षेत्रीय कर्मचारी विनोद कोलते व सौ. रंजना पंदीलवार आदी उपस्थित होते.
लाभार्थी आणि त्यांच्या पालकांनीही शिबिरात सक्रिय सहभाग घेतला.हे विशेष!
0000