वैनगंगा नदीच्या पाण्याने इशारा पातळी गाठली

464

नागरिकांनी सतकर्तता बाळगावी

प्रशासनाने केले आवाहन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
भंडारा/चंद्रपूर/गडचिरोली: गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि जवळील नागपुरात मुसळधार तर गोंदिया सुद्धा सतत मुसळधार पावसाची हजेरी होत आहे. वैनगंगा नदीचे पाणी ईशारा पातळी गाठत असल्यामुळे नदी शेजारील गावे असलेल्या नागरिकांनी सतकर्तता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडारा, गोसेखुर्द धरण विभाग भंडारा व प्रशासनाने केले आहे.

भंडारा क्षेत्रात मागील तीन दिवसापासून अनेक ठिकाणी दमदार पावसाची हजेरी होत असल्याने गोसीखुर्द धरणाच्या पाणी साठयात सतत वाढ होत
आहे. त्यामुळे धरणाचे 33 गेट पैकी (22:2.5M) तर (11:3M) मिटरणे उघडण्यात आले असून 5 लाख 77 हजार 759 क्युसेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सुरु आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या सुमारास धरणाचे 33 गेट उघड्यांत आल होते. आजही धरणाचे सर्व 33 गेट उघडण्यात आले आहेत.

सध्या गोसीखुर्द चे 33 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली. आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल – अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

प्रशासनाचे अलर्ट
आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे.आवश्यकता भासल्यास यावर संपर्क १०७७ करावा.असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अलर्ट
नदी काठच्या गावांना इशारा

गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल.चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन गोसेखुर्द धरण प्रशासनाने केले आहे.

कोणते वाहतूक मार्ग चालू -बंद
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी ते गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C वर पाल नदी वर पाणी असल्याने वाहतुक बंद आहे.तसेच आरमोरी तालुक्यातील गाढवी नदीवरील रामाळा पुलावर तीन फूट पाणी चढल्यामुळे आरमोरी -रामाळा मार्ग आज सकाळपासून बंद आहे.शिवनी व गोंविंदपूर नाल्यांनांही पूर आल्याने गडचिरोली -चामोर्शी मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे.