जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत उपक्रम
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.२४: जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सन २०२५-२६ या वर्षात औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करावी व भरघोस उत्पादन घेऊन आर्थिक सुबत्ता प्राप्त करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
केंद्र पुरस्कृत योजना औषधी वनस्पती संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन या योजनेंतर्गत सन २०१५-१६ पासुन राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रम महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळामार्फत राबविण्यात येत होता. तथापी सन २०२०-२१ पासुन औषधी वनस्पती घटक हा राष्ट्रीय आयुष अभियानाचा घटक नसल्याचे तसेच सन २०२१-२२ पासुन औषधी वनस्पती लागवड योजना बंद करण्यात आले असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. सदरील घटक आयुष मंत्रालयाकडुन कृषि मंत्रालयाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.
तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थीच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड / वृक्ष लागवड व फुलपिके लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत दि. ३०/०४/२०२२ रोजी महाराष्ट्र शासनाकडुन निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अर्जुन, सान, अशोका, बेहडा, हिरडा, बेल, टेटु, डिकेमाली, रक्तचंदन, रिठा, लोध्रा, आइन, शिवन, गुग्गुळ, बिब्ब्या व करंज या १६ वृक्ष वर्गीय औषधी वनस्पतींना अनुदान अनुज्ञेय आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना दि. ३१/१२/२०२५ रोजी प्राप्त झाल्या आहेत.या मार्गदर्शक सुचनांमध्ये औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे.
औषधी व सुगंधी वनस्पती लागवड या घटकाकरिता केंद्र शासनाने सन २०२५-२६ मध्ये रक्कम रु४४०.०० लक्ष एवढ्या रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी दिलेली आहे.
औषधी व सुगंधी वनस्पतीचे पिक निहाय आर्थिक मापदंड खालीलप्रमाणे आहेत.
अ.क्र.१) वनस्पतीचे नाव
औषधी वनस्पतीः- जेष्ठमध/मलेठी, शतावरी, कालीहारी, कळलावी, सफेद मुसळी, गुग्गुळ, मंजिष्ठा, कुटकी, अतिस, जटामासी, अश्वगंधा, ब्राम्ही, तुलसी, विदारीकंद, पिंपळी, चिराटा, पुष्करमुळ
महाग सुगंधी वनस्पतीः- गुलाब, रोझमेरी, निशिगंध, जिरेनियम, कॅमोमाइल, चंदन दवणा, जाई, लॅव्हेंडर
मापदंड (प्रती हेक्टर)
रु. १.५० लाख
रु.१.२५ लाख
देय अर्थसहाय्य (प्रती हेक्टर)
सर्वसाधारण क्षेत्रा मध्ये @ ४० टक्के आणि अधिसुचित क्षेत्रामध्ये ५० टक्के अर्थसहासय्य. लागवड साहित्य व (INM/IPM) चा खर्च २ हप्त्यामध्ये (२ हेक्टरच्या मर्यादित)
सर्वसाधारण क्षेत्रा मध्ये @ ४० टक्के आणि अधिसुचित क्षेत्रामध्ये ५० टक्के अर्थसहासय्य. लागवड साहित्य व (INM/IPM) चा खर्च २ हप्त्यामध्ये (२ हेक्टरच्या मर्यादेत)
इतर सुगंधी वनस्पतीः- पामरोसा,गवती चहा, तुळस, व्हेटिव्ह, जावा, सिट्रोनेला, गोड तुळशीपत्र
रु.०.५० लाख
सर्वसाधारण क्षेत्रा मध्ये @ ४० टक्के आणि अधिसुचित क्षेत्रामध्ये ५० टक्के अर्थसहाय्य. लागवड साहित्य व (INM/IPM) चा खर्च २ हप्त्यामध्ये (२ हेक्टरच्या मर्यादेत)
तरी, सर्व शेतक-यांना आवाहन करण्यात येती की, औषधी व सुगंधी वनस्पती लागवड करु इच्छिणा-या अधिकाधिक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलmahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत असे आवाहन श्रीमती प्रिती हिरळकर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.
0000