विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली :- दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गडचिरोली डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन आणि जी. एच. रायसोनी मेमोरियल डिस्ट्रिक्ट लेवल बॅडमिंटन स्पर्धेचे येत्या 6,7,8, जून 2025 रोजी गडचिरोली येथील रिक्रीएशन बॅडमिंटन हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच या स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू हे जिल्ह्यातीलच असतील आणि 17 वर्षे वयोगट, 19 वर्षे वयोगट, आणि सीनियर वयोगट यांची निवड चाचणी करून टीम तयार करण्यात येणार आहे. सदर निवड करण्यात आलेली टीम ही गडचिरोली जिल्ह्याचे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्टेट इंटर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन स्पर्धेकरिता नेतृत्व करेल अशी माहिती जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन सचिव मुकेश नागपुरे यांनी दिली आहे.
सदर स्पर्धेकरिता जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे खेळाडूंना आवाहन जिल्हा असोसिएशन अध्यक्ष सी. एन. बोकडे आणि उपाध्यक्ष ऍड. अविनाश मुर्वतकर तसेच डॉ. बाळू सहारे ,प्रशांत लाकडे आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून करीत आहेत.