पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) करीता अर्ज करण्याचे आवाहन

129

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.२३: पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास अंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) कार्यान्वित करण्यात आली असून तरूणांना रोजगारक्षम बनवणे हा योजनेचा मुख्य उददेश आहे.

# या योजनेचे पात्रता, निकष

शिक्षण किंवा रोजगारात नसलेले बेरोजगार तरूण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न् रू.८ लाखांपेक्षा जास्त् नसावे किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य् सरकारी नोकरीत नसावा. उमेदवारांचे वय २१ ते २४ असावे.

#ऑनलाईन पोर्टल आणि व्यवस्थापन कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) योजनेच्या व्यवस्थापनासाठी https://pminternship.mca.gov.in/ हे विशेष ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलद्वारे कंपन्या आणि तरुणांना नोंदणी करण्याची व एकमेकांशी जोडले जाण्याची संधी मिळेल. तसेच, सरकार द्वारे थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे आर्थिक सहाय्य वितरित केले जाईल.

#अर्ज करण्याची अंतिम तारीख, उमेदवार 31 मार्च २०२५ पर्यंत या संधीसाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर पोर्टल उमेदवारांच्या प्रोफाइलनुसार संधी जुळवेल आणि कंपन्यांना निवडलेल्या अर्जाची माहिती पाठवेल. उमेदवारांना विविध उद्योगांमध्ये अनुभव घेण्याची संधी मिळेल.

 अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य् विकास रोजगार, व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बेरेक क्र.-२ यूनिट क्रमांक-२ कॉम्प्लेक्स, पोलीस मुख्यालया समोर, गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क करावा, असे सहायक आयुक्त् जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.

0000