सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोलीतर्फे आवाहन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.२०: दिनांक 21 मार्च रोजी जागतिक वन दिनाचे औचित्य साधून सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली मार्फत वनाचे संरक्षण, संवर्धन, वृक्ष लागवड, जैवविविधता, वन्यजीव, कृषि बानिकी क्षेत्र इत्यादी विषयावर गडचिरोली जिल्हयातील विद्यार्थी, शिक्षक व सर्वसामान्य नागरिक यांचेकरिता Slogan Competition चे आयोजन करण्यात आलेले आहे.
वरील विषयावरील नाविन्यपूर्ण Slogan ची निवड करुन गठीत केलेल्या समितीमार्फत मुल्यांकन करुन विजेते ठरविण्यात येणार आहे.
तरी गडचिरोली जिल्हयातील सर्व नागरिकांनी सदर Slogan Competition मध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली मार्फत करण्यात येत आहे.
सहभागी होणा-या स्पर्धकांनी त्यांचेकडील Slogan सिलबंद लिफाप्यात दिनांक 10 एप्रिल, 2025 पर्यंत लिफाप्यावर स्पर्धकाचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक व पत्ता नमूद करुन वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडचिरोली चांदाळा रोड गडचिरोली येथील कार्यालयात कार्यालयीन दिवशी व वेळेत प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे सादर करावे.
00000