राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विशेष तपासणी मोहिमेचा शुभारंभ १ मार्चला

100

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

गडचिरोली,दि.२८: राज्यातील ० ते १८ वर्षापर्यतच्या बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलीच्या सर्वागीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनीक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने मोहिम राज्यस्तरावर राबविण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.

या मोहिमेचा ऑनलाईन शुभारंभ उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आरोग्यमंत्री याच्यां हस्ते होणार असून जिल्हास्तरावर गडचिरोली जिल्हयाचा कार्यक्रम १ मार्च रोजी शासकीय इंग्रजी आश्रमशाळा गडचिरोली येथे सकाळी ८.30 वाजता संपन्न होणार आहे.

तसेच तालुकास्तरावरही या मोहिमेचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. माधुरी किलनाके यांनी दिली.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत संपुर्ण राज्यातील शासकीय व निमशासकीय शाळा आणि अंगणवाडीतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलींची सर्वागीण आरोग्य तपासणी करीता राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रम विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत 0 ते 18 वर्षा पर्यतच्या बालकांची, किशोरवयीन मुलां मुलीची तपासणी,आजारी आढळलेल्या बालकांवर तात्काळ उपचार, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरवणे, सुरक्षित आरोग्यसाठी समुपदेशन यांच्या समावेश आहे.

जिल्ह्यातील तालुकास्तरावर उद्या सकाळी ८.30 वाजता मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.जिल्हयातील मुला-मुलींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. माधुरी किलनाके यांनी केले आहे.

0000