विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली::अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती यांचे विद्यमाने विदर्भात प्रथमच विदर्भातील कलावंतांसाठी नोंदणी महामेळाव्याचे आयोजन आज रविवार दि. 29 डिसेंबर 2024 रोजी,दुपारी ठीक 12.00 वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली शासकीय विश्रामगृह जि. गडचिरोली (विदर्भ) येथे करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय कलावंत न्याय समितीचे अध्यक्ष, सुप्रसिध्द गायक सोमनाथ गायकवाड हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तसेच प्रमुख अतिथी ऍड. श्यामदादा खंदारे (राष्ट्रीय महासचिव) अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती,तर प्रमुख अतिथी म्हणून अभियंता- कवि मनोहर शहारे (विदर्भ विभाग प्रमुख) अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती आदी उपस्थित राहणार आहेत.
कलावंतांनी महामेळाव्यास येताना कागदपत्रे सोबत घेवुन यावे 1) आधार कार्ड 2) आयकर कार्ड 3) रेशन कार्ड 4) जातीचा दाखला 5) 500/-₹ नोंदणी शुल्क यासह आवर्जून उपस्थित रहावे.
विदर्भातील खालील कलावंतांची होणार महामेळाव्यात “अधिकृत” नोंदणी
कवि / गायक / साहित्यिक / लेखक / अभिनय / नाटककार / निर्माता / दिग्दर्शक / / संगीत विशारद / शास्त्रीय गायन सुगम गायन/भजनी मंडळ / कीर्तनकर भारुडकार / प्रवचनकर / तमाशा कलावंत / ऑर्केस्ट्रा कलावंत / डान्सर / जागरण गोंधळ / बहुरुपी / आराधी / गोंधळी / देवदासी / पोतराज / वासुदेव / पिंगुळ / नंदी बेल / महिला-पुरुष ढोल पथक / बेंजो – ब्रास बॅन्ड पथक / आदिवासी कला पथक / झाडीपट्टी कलावंत / विविध प्रकारचे वाद्य वाजविणारे कलावंत अशा सर्वच कलावंत यांची नोंदणी केली जाणार आहे.
सदर मेळाव्यात विविध प्रकारच्या कलाकार यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महामेळावा आयोजक यांनी केले आहे.








