जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री निवड चाचणीसाठी धावले बहुसंख्य धावपटू

274
  • विविध गटातील विजेत्या धावपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता झाली निवड

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत गडचिरोली जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आज दिनांक २२/१२/२०२४ रविवारला सकाळी ७:३० वाजता शहरातील वडसा रोड वरील टी.सी.सी. ग्राउंड येथे जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले होते.यात परिसरातील व विविध ठिकाणच्या धावपटूंनी सहभाग दर्शवित महिला, पुरुष गटात धावस्पर्धा जिंकली.

 

सदर स्पर्धा खुला गट ,२० वर्ष, १८ वर्ष, १६ वर्षा आतील गटात आयोजित करण्यात आलेली होती. ज्यामध्ये  पुरुषांच्या खुला गटात १० किमी. दौड स्पर्धेत अमोल कालिदास मडावी प्रथम ,आकाश जयदेव पुंघाटे द्वितीय ,अविनाश शरणदास कांदो  तृतीय ,अनिकेत मनोहर बोरसे चौथा, रितिक विनायक मोहूर्ले पाचवा क्रमांक पाठविला तर महिलांच्या गटात १० किमी . दौड स्पर्धेत अमिषा राजू घाटुरकर प्रथम, सुहानी युवराज चाटारे द्वितीय ,गुड्डी हिवराज चाटारे तृतीय क्रमांक पटकाविला
२० वर्षाआतील पुरुषांच्या गटात  ८ किमी. दौड स्पर्धेत जितेंद्र बळीराम चौधरी प्रथम, निखिल हेमंत चिलबुले द्वितीय सुमित विजय ढोरे तृतीय, कृष्णा नानाजी बोरकर चौथा तर कुणाल यशवंत देशमुख याणे पाचवा क्रमांक यांनी पटकविला. तर महिलांच्या गटात ६ किमी . दौड स्पर्धेत भाग्यश्री भालचंद लेनगुरे प्रथम, लीना एकनाथ घाटुरकर द्वितीय ,शिल्पा संजय भुरसे तृतीय, चारुलता युवराज तिजारे चौथा क्रमांक पटकाविला तसेच 
१८ वर्षाआतील मुलांच्या गटात ६ किमी. दौड स्पर्धेत पियुष रामेश्वर सोनुले प्रथम बयान अब्बासखाँ पठाण द्वितीय  क्रमांक पटकाविला तर मुलींच्या गटात ४ किमी . दौड स्पर्धेत सलोनी रामदास तोफा प्रथम, नंदनी खुशाल गेडाम द्वितीय  क्रमांक पटकाविला तर १६ वर्षाआतील मुलांच्या गटात २ किमी दौड स्पर्धेत विवेक किशोर भोयर प्रथम, भाविक आनंदराव झाडे द्वितीय तर मुलींच्या गटात २ किमी. दौड स्पर्धेत खुशी दिनेश लांबट प्रथम, प्रिया जयलाल उईके द्वितीय क्रमांक पटकावून विजयश्री खेचून आणली. येत्या २०२५मधील ३जानेवारी रोजी अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केलेले आहे.

सदर कार्यक्रमाची सुरुवात भारतीय सेनेचे जांबाज सैनिक व महान आंतरराष्ट्रीय धावपटू ( फ्लाईंग सिख ) कॅप्टन. मिल्खा सिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पार्पण करून करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गडचिरोली जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव आशिष नंदनवार तर प्रमुख अतिथी म्हणून वाकडे बडवाईक,राहुल जुआरे, विजय मुळे ,महेश उरकुडे ,महिंद्रा मने , सुरज पडोळे उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यातील विजेते धावपटू अमरावती येथे होणाऱ्या क्रासकंट्री स्पर्धेत कौशल्यपूर्ण कसब पणाला लावून विजेतेपद पटकावतील असा दुर्दम्य आशावाद व्यक्त केला जात आहे.

कार्यक्रमाचे संचालन राकेश सोनकुसरे यांनी केले तर आभार राहुल जुआरे यांनी मानले.