सर्व स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
नागपूर: येथील प्रहार मिलिटरी स्कूलच्या इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेल्या मानवेंद्र किशोर गोंदोळे या विद्यार्थ्यांने हिंदी मोरभवन फ्रन्ट आॅफ झांसी राणी चौक सिताबर्डी , नागपूर येथे रविवारी,१५ डिसेंबर २०२४ ला आयोजित केलेल्या ५व्या राज्य स्तरीय खुल्या कराटे स्पर्धेत प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करीत विजयश्री खेचून आणली.त्याबद्ल त्याला आयोजन समितीचे वतीने गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले.
मानवेंद्र हा शालेय स्तरावर होत असलेल्या विविध स्पर्धामध्ये हिरहिरीने सहभाग घेत असतो.तसेच कुठल्याही स्पर्धेत तो जिद्द,चिकाटी व अथक परिश्रम या त्रिसूत्रीच्या बळावर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सराव करीत असतो.हे विशेष!
मानवेंद्रने आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाच्या प्राचार्या वंदना कुलकर्णी, कराटे प्रशिक्षक सुधिर चव्हाण, किशोर गोंदोळे,सौ.प्रियंका किशोर गोंदोळे (आई -बाबा) यांना दिले आहे.
त्याच्या अचाट साहसी वृत्ती व यशस्वीतेबद्द्ल विद्यालयाचे शिक्षक तसेच सुरेशराव सेलोकर,सौ.नंदा सुरेशराव सेलोकर (आजी- आजोबा), विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे,सौ.दिपलक्ष्मी गोंदोळे, आकाश सेलोकर,कु.निवेदिका,कु.संस्कृती, विष्णू गोंदोळे तसेच मानवेंद्र मित्रमंडळ आदींनी अभिनंदन केले आहे.









