महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काॅंग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिवपदी डॉ.आशिष कोरेटी

392

सर्वत्र होत आहे अभिनंदनांचा वर्षाव

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):ऑल इंडीया आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे व प्रदेशाध्यक्ष श्री बळवंत गावीत यांनी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव पदी गडचिरोली जिल्ह्यातील कर्तबगार युवा नेते डॉ.आशिष कोरेटी यांची नियुक्ती केली आहे.

आदिवासी बहुल भागात काँग्रेसच्या वाढीसह जनसामान्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या डॉ. आशिष कोरेटी यांची प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.हे विशेष!

डॉ.आशिष कोरेटी यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये सन 2014 पासून आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भ ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशन व व.ज.ह.( वन-जन-हक्क) फाउंडेशन मार्फत विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्नांना मार्गी लावणे पासून ते ग्रामीण भागात विविध आजारांवर औषधोपचार करण्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित केले होते.या कामांची दखल घेत सन्मान म्हणून महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव पदी डॉ. आशिष कोरेटी यांची नियुक्ती केली.

डॉ.आशिष कोरेटी यांनी आपल्या निवडीचे श्रेय काॅंग्रेसचे जेष्ठ नेते, गडचिरोली जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते यांना दिले आहे.

निवडीबद्दल त्यांचे गडचिरोली जिल्ह्यात तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्रात सामाजिक कार्यकर्ते,पक्षाचे नेते व कार्यकर्ते तसेच जनसामान्यांकडून कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.