बालमैत्रीनींनी केला जागतिक कन्या दिवस साजरा

148

कु.निवेदिकाकु.संस्कृती यांच्या मैत्रीणी एकवटल्या

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली), दि.२२ सप्टेंबर २०२४: जागतिक कन्या दिवस व कु.निवेदिका दिपलक्ष्मी विलास गोंदोळे हिचा वाढदिवस (२१सप्टेंबर )याचे औचित्य साधून सर्व मैत्रीणी एकवटल्या व केक कापून, एकमेकींना शुभेच्छा देत वाढदिवस व जागतिक कन्या दिवस उत्साहात साजरा केला.

याप्रसंगी बाल मैत्रीनींनी आपल्या लहानपणीच्या आठवणी, शैक्षणिक विविध विषय, लहानपणीचे खेळ, आपली आवडती शाळा आदींबाबत चर्चा केली.आई वडीलांची आपुलकी,सहकार्य व कृतज्ञ भाव याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.केक व खाऊचा आस्वाद घेत ‘पुढच्या वर्षी जास्तीत जास्त बालिकांना सोबत घेऊन कार्यक्रम साजरा करूया’ असे सांगत, एकमेकींना बाय बाय करीत निरोप घेतला.

यावेळी निवेदिका गोंदोळे, संस्कृती गोंदोळे, समिधा मने,संचिता मने,दिक्षा दुमाने, उन्नती गोंदोळे,श्रेया गोंदोळे, सानिया ढोंगे,शनया गोंदोळे,वैष्णवी बिहारी,पलक पत्रे,अळबी रामटेके,गोल्डी रामटेके आदी उपस्थित होत्या.