क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन व प्रबोधन

375

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त नुकतेच आरमोरी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा आरमोरीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून उपस्थित मान्यवरांनी प्रबोधन केले.

कार्यक्रमाचा प्रारंभ प्रमुख मार्गदर्शक हरिदास कोटरंगे यांनी अंनिसच्या चळवळ गीत गायनाने केला.तसेच क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माळी समाजाचे जिल्हा अध्यक्ष मंगलदास कोटरंगे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून मनसे जिल्हा उपाध्यक्ष रणजित बनकर, पत्रकार व प्रिंसिपल अमरदीप मेश्राम,पत्रकार बंधू महेंद्र रामटेके, दौलत धोटे, सामाजिक कार्यकर्ते रामहरी वाटगुरे ,ज्योती मस्के आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मार्गदर्शक हरिदास कोटरंगे यांनी स्त्रीने स्त्रिला समानतेची वागणूक द्यावी,तेव्हाच समाजात समानता रूजेल.फक्त पुरूषांनी समानतेची वागणूक देऊन चालणार नाही असे रोखठोक मत व्यक्त केले.तर वैज्ञानिक जाणिव गडचिरोली अंनिसचे राज्य सरकार्यवाह, विलास निंबोरकर यांनी श्रध्दा आणि अंधश्रद्धा कशी ओळखावी.तसेच संविधान वाचविणे ही सर्वांची जबाबदारी आहे असे मत मांडले.अंनिस महिला आघाडी अध्यक्षा सुधाताई चौधरी यांनी मौलिक विचार मांडले.चारूदत्त राऊत व भारती मेश्राम यांनी आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमात अंनिसच्या पाच नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंनिस तालुका अध्यक्षा सौ. सुनिता तागवान यांनी केले. सुत्रसंचालन सुजाता अवचट यांनी केले तर शिल्पा मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाला अंनिस तालुका पदाधिकारी सुजाता अवचट, उषा मेश्राम, भावना बारसागडे, शिल्पा मेश्राम, योजना मेश्राम, रेशमा रामटेके, भारती मेश्राम, विभा बोबाटे, चारुदत्त राऊत, बालकदास कोटरंगे, संध्या लांडगे तसेच बहुसंख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.