गरजूसांठी जोगिसाखरा जंकासं ठरत आहे देवदूत!

174

मृतक सदस्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): जोगिसाखरा येथील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था ज ही आज पर्यंत सेवाभावाची जान ठेवून परिसरातील संस्थेच्या सभासद व कुटुंबियांकरिता त्यांच्या दुःखाच्या प्रसंगी धावून जावून त्या कुटुंबातील सदस्यांना यथोचित आर्थिक मदत करीत आहे.त्यामुळे परिसरातील जनता संस्थेला व पदाधिकारी यांना जणूकाही परमेश्वराचे दूत म्हणजे चे ‘देवदूत’ संकटकाळी धावून येत असल्याचे चर्चिले जात आहे.

जंकासं संस्थेचे जोगीसाखरा येथील सभासद संजय सडमाके यांचे वडिल गाव देवारी म्हणून जवळपास ५० वर्ष सेवा देणारे विठोबा सडमाके वय ८२ यांचे १९ फरवरी ला सायंकाळी आजाराने निधन झाले. तसेच काही दिवसांपूर्वी श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे सभासद किन्हाळा येथील रहिवासी विक्रम चंदु मठ्ठे व रामपुर येथील जंकास संस्थेचे सभासद मिराबाई नेवाजी ठाकरे याचेही निधन झाल्याने त्याच्या परीवारावर डोंगरच कोसळले असल्यामुळे सामाजिक दायित्वाच्या दृष्टीने सभासद व कुटुंबांच्या सुख दु:खात श्री गुरुदेव जंगल कामगार संस्था सहभागी होऊन श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या हस्ते सस्थेच्या वतीने अंत्यविधीसाठी साठी मृतकाचा मुलगा व संस्थेचे सभासद संजय सडमाके व मृतक सभासदाच्या मुलांकडे मदत देण्यात आली.

यावेळी श्री गुरुदेव जंकासं संस्थेचे उपाध्यक्ष शेषराव कुमरे, संचालक गोपाल खरकाटे, संचालक सुरेश मेश्राम, संचालक दामोदर मानकर, संचालक यादोराव कहालकर , उज्वला मडावी ,गोपिकाबाई कोल्हे, गणेश सयाम, जयद पेन्दाम, प्रमोद मठ्ठे, शंकर टेकाम, विवास कादोर, चंद्रभान भरे, भिवा बेदरे, दामोदर मानकर, लिपिक गुणवंत जांभूळे, रामदास सयाम ,लक्ष्मण सडमाके, विजय सहारे ,चौकीदार दिवाकर राऊत, यशवंत मरापे, जितेंद्र येळमे, मधुकर सयाम, विनोद ऊईके, प्रेमा कहालकर, वासुदेव ठाकरे ,मारोती ऊईके, जितेंद्र सडमाके, हरीचंद खरकाटे, श्रीहरी ढोरे ,अरुण ठाकरे, भाऊराव प्रधान ,अशोक ठाकरे, सचिन कुमरे, गुलाब सयाम, रामु मडावी, निखिल प्रधान, संपन चौके आदी उपस्थित होते.

श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था ही अडचणीत सापडलेल्या प्रत्येक सभासदाच्या सुख दुःखात सहभागी होऊन विविध मार्गाने मदत करण्यास कटिबद्ध राहुन यापूर्वी ही अनेक सभासदांना व त्यांच्या कुटुंबीयांना वेळेवर आथिर्क मदत व अडीअडचणी सोडविण्याचे प्रयत्न करीत असल्याने श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे जनताजनार्धनांकडून कौतुक केले जात आहे.