विशेष अतिथी व उपस्थित समाजबांधवांचा संकल्प
संत रविदास जयंती उत्साहात
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):संत रविदास महाराज चर्मकार समाज मंडळ आरमोरी, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने संत रविदास महाराज यांची जयंती दिनांक २४फेब्रुवारी २०२४रोजी आरमोरी येथील समाज मंदिरात विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी यानिमित्ताने सर्व प्रथमतः संत रविदास महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.दिपप्रज्वलन करून उपस्थित समाज बांधव व मान्यवर यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले.तसेच आरमोरी- वडसा -देसाईगंज महामार्गावरील नियोजित समाज मंडळाचे जागेवर पूजन व माल्यार्पण करून संत रविदास महाराज यांचे विचारकार्य स्वतः अंगिकारून समस्त समाज बांधवांच्या उन्नती साधावी या उदात्त हेतूसाठी अविरत कार्य करण्याचा एकमुखी संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्थळी भजन गीत गायन करून गोपालकाला व दहीहंडीचे आयोजन करण्यात आले.तसेच प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष पुंडलिक पेलणे, उपाध्यक्ष राजू वादिकर, सचिव नारायण वाढई, विनायक पेलणे, युवारंगचे रणजित बनकर, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे,किसन वाढई, दिलीप म्हशाखेत्री, सुरेश म्हशाखेत्री, गुणवंत बावणे,कैलाश वादिकर, मिथुन वादिकर,चंदू वादिकर, रमेश बन्सोड,निकेश वादिकर, रामदास वाढई, वासुदेव पेलणे,आनंदराव पेलणे,शालीकराम बनसोड,अशोक बन्सोड, किशोर वादिकर, देविदास बन्सोड, नितीन म्हशाखेत्री, तुळशीदास पेलणे, एकनाथ पेलणे, किशोर पेलणे,निर्भय वादिकर, नेपचंद् पेलणे,सौ.निलू पेलणे, कमलबाई म्हशाखेत्री, पार्वताबाई पेलणे, रमाबाई वादिकर, शोभा पेलणे, लता मुळे,सरिता वाढई, भुमिका वाढई, सुनीता बावणे तसेच समस्त चर्मकार समाज बांधव, भगिनी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्थळी सायंकाळी सर्व समाजबांधव व विविध समाजातील समाज बांधव, भगिनी यांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.









