गडचिरोली जिल्ह्यातून द्वितीय पुरस्काराची मानकरी ठरली निवेदिका गोंदोळे
दै.लोकमत वृत्तपत्राच्या ‘संस्कार आई-बाबां’चे कूपन स्पर्धा
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): स्थानिक महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता सहावीत शिक्षण घेणारी कु.निवेदिका विलास गोंदोळे हिने दैनिक लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित ‘संस्कार आई-बाबां’चे या प्रश्नोत्तरी कूपन स्पर्धेत सहभागी होऊन गडचिरोली जिल्ह्यातील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.यातून तीने आपल्या बुध्दीची चूणूक दाखवून आपल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
दैनिक लोकमत वृत्तपत्र हे गत अनेक वर्षांपासून बालक, विद्यार्थी, युवक,सखी, सामाजिक, कृषी,सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, संरक्षण,मनोरंजन,सोशल मिडिया,माध्यम व व्यावसायिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बजावत असलेल्या महानुभाव व्यक्तीमत्वांच्या यशोगाथा सादर करीत असते.मान्यवरांचा सत्कार करीत असते.विद्यार्थी दशेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या बाबींचे आकलन व्हावे याकरिता २०२३-२४च्या सत्रात ‘संस्कार आई-बाबांचे’ हे सदर एक अनुभवी, संघर्षशील व नावारूपास आलेल्या व्यक्तीमत्वांवर आई वडीलांच्या झालेल्या संस्कारांच्या गाथा प्रकाशित करीत होते.हे गत जवळपास चार महिने सुरू होते. यात परिच्छेद वाचनांतर विद्यार्थ्यांना कूपन स्वरूपात असणाऱ्या प्रश्नाचे पर्यायांपैकी अचूक उत्तरावर दिलेल्या चौकटीत बरोबर ची खूण करायची होती.तसेच ते दिलेल्या चार्ट मध्ये व्यवस्थित कापून चिटकवून ठेवायचे होते.
सदर स्पर्धेत कुमारी निवेदिका हिने सहभागी होऊन आई , वडील व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या सदराचे नियमित वाचन करून प्रश्नाचे अचूक उत्तरावर खूण करून, कूपन कापून चिटकवून घेत होती.यात सातत्य, चिकाटी व परिश्रम ही तिच्या स्तरावरील सर्वात मोठी बाब होती.शेवटी नियमानुसार स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.त्यात ती गडचिरोली जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची विजेती ठरली.
विजेत्या कुमारी निवेदिका हिला ‘ब्लुटुथ काॅलींग वाॅच’ या द्वितीय पारितोषिकाचे वितरण विद्यालयाचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार, लोकमतचे पत्रकार महेंद्र रामटेके,शिक्षीका सुषमा डांगे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच यावेळी तीचे आई- वडील सौ.दिपलक्ष्मी व विलास गोंदोळे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विलास गोंदोळे, सचिव हेमंत निखारे,शिक्षीका परतेकी,मावानी,प्रिती धाईत तसेच शिक्षक हिवराज सयाम, किशोर सहारे,गौरव नारनवरे, प्रेम सयाम, शिक्षकेतर कर्मचारी भानारकर,किसन सोनकुसरे आदी उपस्थित होते.
यशस्वीतेबद्दल सर्व स्तरातून तीचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.