सर्व ओबीसी संघटनांचा पुढाकार
८ फेब्रुवारीला तावसी,बारर्व्हा, लाखांदूर,वडसा, ब्रम्हपुरीत
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
भंडारा/गडचिरोली/चंद्रपूर: सर्व ओबीसी संघटनांच्या सहकार्याने ओबीसी, व्हीजे,एन टी,एसबीसी जनजागृती अभियानातंर्गत विदर्भातील ७ जिल्ह्यात दिनांक ३फेब्रुवारी ते १२फेब्रुवारी २०२४ पर्यंत ओबीसी जनजागरण यात्रा भ्रमण करणार आहे.यावेळी नियोजित स्थळी यात्रेतील मार्गदर्शक विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
सदर यात्रेची सुरुवात वर्धा येथील सेवाग्राम बापू कुटी, महात्मा गांधी आश्रम येथून दिनांक ३फेब्रुवारी २०२४रोजी प्रस्थान करणार आहे.पूढे ती कवठाळा,लखमापूर,बल्लारपूरआक्सापूर,४फेब्रु. – पवनार, सेलू, केळझर, बुटीबोरी, नागपूर (पॉक फॉर जनगणना) मौदा, जवाहरनगर, शहापूर, गोपेवाडा, मोहदुरा, हत्तीडोई, सातोना, खुर्शीपार, टवेपार, खोकर्ला, भंडारा.५ फेब्रु. – केसलवाडा (किसान चौक), पांढराबोडी, वरठी, पाचगाव, नेरी, पिंपळगाव, हरदोली, वडेगाव, आंधळगाव, डोंगरगाव, भिकारखेडा, विहीरगाव, सालई, खापा, माडगी, तुमसर.६ फेब्रु. – बिरसी फाटा (तिरोडा), वडेगाव, सुकळी, कुन्हाडी, कवलेवाडा, चुटिया, दासगाव, काटी, रावणवाडी, कामठा, कालीमाटी (भोसा) आमगाव.७ फेब्रु. कावरा बांध, सालेकसा, तिनखेडी, साखरीटोला, तीगाव, तुमसर, तिल्ली मोहगाव, पडसगाव डव्वा, जांभळी, सडकअर्जुनी, साकोली, सानगडी, दिघोरी मोठी.८ फेब्रु. तावसी, बारवा, लाखांदुर, वडसा, ब्रम्हपूरी. ९ फेब्रु. – नागभीड, सिंदेवाही, मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर आक्सापूर, कळमना, बल्लारपूर, विसापूर.नांदगावपोडे, सास्ती गवळी, रामपूर, राजुरा, अंबुजा सिमेंट, गडचांदर १० फेब्रु.११ फेब्रु. – लखमापूर, भाखर्डी, भोयेगाव, कवठाळा,
धानोरा, घुग्गुस, पुरड, वणी. १२ फेब्रु. – वरोरा, भद्रावती, चंद्रपूर येथे यात्रेचे समापन होणार आहे.
यात्रा ही ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा,ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे व २१,६०० विद्यार्थ्यांसाठी आधार योजना लागू करा, महाज्योती संस्थेस १००० कोटी रुपयाचा निधी द्यावा ,इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे सर्व जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय,अधिकारी, ओबीसी भवन निर्माण करा, वर्ग १, २, ३, ४ च्या सर्व परीक्षा एम.पी.एस.सी. मार्फत घ्या, नोकर भरतीत कंत्राटीकरण, खाजगीकरण बंद करा,शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या,घरकुल योजनेचे आर्थिक सहाय्य ५ लाख रुपये करा आदी मागण्यांना घेऊन नियोजित ठिकाणी मार्गक्रमण करीत मार्गदर्शन करणार आहे.
सदर यात्रेला ठिकठिकाणी संबंधित प्रवर्गातील विद्यार्थी, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा असे आवाहन ओबीसी युवा अधिकार मंच व संघर्ष वाहिनी संयोजक उमेश कोर्राम, अनिल डहाके,पियुष आकरे, खेमेंद्र कटरे, दीनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार,गोपाल सेलोकर, संजय भुरे आदींनी पत्रकातून केले आहे.








